उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतिहास – उद्या ठरणार कारभारी कोण ?
कै पवनराजे यांनी कार्यशैलीने गाजावीला काळ तर बिराजदार सर्वाधिक काळ चेअरमनपदी
महाविकास आघाडीच्या पुढील संसाराची दिशा ठरणार ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा असणार असून मतमोजणीनंतर बँकेचा नवा कारभारी कोण ? हे ठरणार आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्तिथी बिकट असताना जिल्हा बँक कोणाच्या हातात येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे त्यातच निवडणुकीत पाहिल्यादा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली आहे तर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात एकटी या बलाढ्य पक्षांना लढत देत आहे, आमदार राणा यांच्यामुळे भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात कै पवनराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यशैलीने काळ गाजावीला तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सर्वाधिक काळ प्रशासकीय काळ चेअरमन म्हणून गाजावीला. जिल्हा मध्य वर्ती बँक नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे त्यामुळे यावेळी काय होते हे पाहावे लागेल.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ 2002 ते 2009 हा 7 वर्ष 2 महिने प्रशासकाचा राहिला. सुरेश माणिकराव बिराजदार यांनी सर्वाधिक काळ चेअरमन पद उपभोगले,त्यांनी 19 मे 2015 ते आजवर असा 6 वर्ष 9 महिने चेअरमनपद भूषविले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापननेनंतर सर्वात पहिले चेअरमनपद भूषविण्याचा मान हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव देवराज चव्हाण यांना मिळाला. चव्हाण हे 14 ऑगस्ट 1984 ते 14 ऑगस्ट 1986 या काळात 2 वर्ष चेअरमनपदी होते
कै पवनराजे निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यशैलीने जिल्हा बँकेचा काळ गाजावीला. त्यावेळी राजकारणात सर्वेसर्वा असलेल्या डॉ पदमसिंह पाटील व पवनराजे याचे चांगले संबंध होते. कै पवनराजे हे 27 नोव्हेंबर 1996 ते 6 मे 2002 या 5 वर्ष 5 महिने या काळात चेअरमनपदी होते, जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही मुद्यावरून त्या दोघां धुरंदर राजकीय नेत्यात वितुष्ट आल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आणि हत्याकांडनंतर भाऊबंदकीच्या सूडाच्या राजकारणाला सुरुवात झाली. जिल्हा बँकेच्या आजच्या स्तिथीत सुद्धा महाविकास आघाडी व्यतिरिक्त काही ठिकाणी अंतर्गत छुपी मदत झाल्याने काय होते यावर पुढील महाविकास आघाडीचा संसार व पुढील दिशा अवलंबून आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका आहेत.
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी आजवर 11 चेअरमन झाले त्यात मधुकरराव चव्हाण, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील,विक्रम दगडोबा पडवळ,महारुद्र आनंदराव मोटे, लक्ष्मण आनंदराव मोटे,शिवाजीराव प्रतापराव चालूक्य,पवनराजे निंबाळकर, बापूराव माधवराव पाटील, पंडितराव प्रलहादराव टेकाळे, सुरेश बिराजदार हे होते त्यात मधुकरराव चव्हाण, विक्रम पडवळ,महारुद्र मोटे,बापूराव पाटील या 5 जणांनी दोन वेळेस चेअरमनपद भीषविले. पवनराजे यांच्या नंतर शिवाजीराव चालूक्य यांनी 5 वर्ष 10 महिने चेअरमनपदी होते. बापूराव पाटील यांनी 2 वेळेस 4 वर्ष 9 महिने पद भूषविले. सर्वात कमी काळ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा प्रतिष्ठेचा होता.
आजवर जिल्हा बँकेच्या काळात 17 व्हॉइस चेअरमन झाले त्यात सर्वाधिक काळ हा भाजपचे नेते पाटील चिंतामणराव शिंदे यांचा 19 मे 2005 ते आजवरचा असा 6 वर्ष 9 महिने असा आहे.उपाध्यक्ष म्हणून विनायकराव पाटील, विक्रम पडवळ,अशोकराव इंद्रजीतराव जवळगे,नानासाहेब बळीराम जाधवर, शिवाजीराव चालूक्य,शिवाजी गाढवे, सुरेश बिराजदार,ऍड सुभाषराव मोरे, शिवाजी गणपतराव पाटील, पंडितराव प्रल्हादराव टेकाळे, राहुल काकासाहेब पाटील, नारायण किसनराव समुद्रे, संजय गौरीशंकर देशमुख व कैलास शिंदे यांचा समावेश आहे.