मराठा आरक्षण – छत्रपती संभाजी महाराज यांना वाढता पाठिंबा , आमदार राणाजगजीतसिहं पाटील करणार उपोषण
मराठा समाजाचा अंत पाहू नका , उद्रेक होण्या अगोदर आरक्षण द्या
उस्मानाबाद – समय सारथी
मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर पेटणार असल्याचे दिसते. छत्रपती संभाजी महाराज याच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील उद्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करतील.
मराठा समाजाचा अंत पाहू नका , सगळं चूकच सुरु आहे. उद्रेक होण्या अगोदर सावरून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.आंदोलन उग्र झाल्यास त्यास ठाकरे सरकार जबाबदार असेल असा इशारा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांना सरकारने काही आश्वासन दिले होते मात्र त्याला अनेक महिने लोटले तरी ते पूर्ण झाले नाही त्यामुळे समाजात नाराजीचा संतापजनक सूर आहे. ठाकरे सरकार यांची भूमिका चुकीची असून छत्रपती संभाजी महाराज यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही आम्ही सर्व समाज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी , सोबत आहोत त्यामुळे उद्या आम्ही आंदोलन करणार आहोत.
आमदार पाटील यांनी तुळजापूर येथे याबाबत आढावा बैठक घेतली यावेळी विनोद गंगणे, अविनाश गंगणे, संतोष बोबडे,सचिन पाटील, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे हे उपस्थित होते. या उपोषणाला उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पाटील व आयोजकांनी केले आहे.