भैरवनाथ शुगर संचलित तेरणास साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील रोलरचे पूजन
तब्बल एका तपानंतर कारखाना सुरु होणार असल्याने शेतकरी,सभासद, कामगार आनंदी
धाराशिव – समय सारथी
भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सन २३-२४ गळीत हंगामातील रोलर पूजन भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत व व्हॉईस चेअरमन अनिल सावंत व तेरणाचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत आदींच्या हस्ते विधिवत पूजन आजच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
तब्बल एका तपानंतर म्हणजे गेल्या बारा वर्षापासून विविध कारणावरून बंद असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना सभासद मंडळींच्या प्रयत्नामुळे व जिल्हा बँकेचे तेरणावर तीनशे कोटीच्या जवळपास कर्ज असल्याने अवसायनात निघून थकीत कर्जापोटी तेरणा पंचवीस वर्षासाठी भैरवनाथ शुगर वर्क्स कडे निविदा प्रक्रिया द्वारा चालवण्यास देण्यात आला.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर वर्कसचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत व तेरणाच्या सर्व टीमने अथक प्रयत्न करून बारा वर्षापासून जीर्ण अवस्थेत पडलेला तेरणा सहकारी साखर कारखाना गेल्या सहा महिन्यात भैरवनाथ ने ताबा घेताच सर्व विभागातील खाते प्रमुख व कर्मचारी आदींनी अखंड परिश्रम करून अल्पावधीत तेरणा साखर कारखाना चालू करण्याची तयारी केलेली आहे, त्याचा एक भाग म्हणून रोलर पूजन पार पडले.
या कार्यक्रमास भैरवनाथ शुगर वर्क्स कार्यकारी संचालक तथा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत ,विहाळ युनिटचे कार्यकारी संचालक किरण सावंत ,धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ ढोकीचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, प्रविण बुकन,नवनाथ सुरवसे,गुणवंत पापा देशमुख, तेरणाचे वर्क्स मॅनेजर प्रमोद देशमुख, प्रोसेस मॅनेजर सुंदर अवाड, वाशी युनिटचे चिप केमिस्ट पांचाळ, वाशी युनिटचे चिप इंजिनियर श्री आविनाश पवार, डिस्टलरी मॅनेजर अरुण पाटील, सीनियर डिस्टलरी मॅनेजर विठ्ठल शिरसट ,कोजनरेशन मॅनेजर बसवेश्वर थळकरी ,चीप अकाउंटंट पंडित बिरादार, शेतकी अधिकारी शितोळे सुरक्षा अधिकारी राजाभाऊ लाड , राहुल वाकुरे,तेरणातील सर्व विभागातील कर्मचारी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या बारा वर्षापासून जीर्ण आवस्थेत धुळखातपडलेला तेरणा साखर कारखाना तब्बल एक तपानंतर चालू होणार यामुळे शेतकरी सभासद ,कामगारात नव चैतन्य पसरले असून पुन्हा एकदा तेरणास गतवैभव प्राप्त होणार या आनंदात सर्व मंडळी दिसून आली.