संभाजी महाराज यांची ठाकरे सरकारकडून फसवणुक – मराठा समाजाचा अंत पाहू नका
तुळजापुरात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे उपोषण सुरु
उस्मानाबाद – समय सारथी
ठाकरे सरकारने खोट बोलून छत्रपती संभाजी महाराज यांची फसवणूक केली आहे. राजे उपोषण करित आहेत आणी राज्य सरकार त्याची साधी दखल घेत नाही हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार मधील एकही मंत्री संभाजी राजे यांना भेटला नाही किंवा त्यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली नाही ही बाब दुर्दैवी आहे.मराठा समाजाचा अंत पाहू नका असा इशारा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सरकारला दिला. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणानून गेला.
छत्रपती यांची फसवणूक म्हणजे सामान्य जनतेचा अपमान आहे.अजून वेळ गेली नाही त्यामुळे ठाकरे सरकारने सावरावे, मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार राहील.एका राज्यात 2 मागासवर्ग आयोग हे कुठल्या नियमात बसते, सरकारने मराठा समाजासह इतर समाजावर अन्याय व फसवणूक केली आहे. खासदार छ्त्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपोषण समर्थनार्थ तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे लक्षणिक उपोषण सुरु आहे. या आंदोलनात मुस्लिम समाजासह अन्य लोकांनी सहभागी होत पाठिंबा दिला.
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या परंतु त्या पुर्ण न झाल्याने खा छ्त्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची आरती करून जोरदार घोषणाबाजी करून लाक्षणीक उपोषण सुरू केले .राज्य सरकार छत्रपतीसह सर्वच समाजाची दिशाभुल करत असुन वेळ काढूपणा करत आहे . छत्रपतीच्या उपोषणाची दखल न घेतल्यास होणाऱ्या परिणामाला हे ठाकरे सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला.
छत्रपती संभाजी राजे यांना शब्द दिले होते ते पाळले नाहीत, संभाजी राजे हे तळमळीने व कळकळीने गेली अनेक वर्ष लढा देत आहेत.मुख्यमंत्री यांनी 15 दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले मात्र अनेक महिने झाली तरी ते पूर्ण झाले नाही. सरकार कोणाचे आहे ? कोणासाठी राज्य चालवितात हे कळत नाही. छत्रपती संभाजी राजे हे शांत संयमी नेतृत्व आहे त्यांच्या संयमामुळे मराठा समाज शांत आहे त्यांची फसवणूक सुरु आहे असा आरोप आमदार पाटील यांनी केला.
मराठा आरक्षण उपोषण आंदोलनाला नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नेताजी पाटील, सुनील काकडे, विनोद गंगणे, राजसिंह राजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,उपसभापती सुरेश कवडे, अविनाश गंगणे, आनंद कंदले, रामहरी शिंदे, अनिल काळे, संजय पाटील, देवकन्या गाडे,धनंजय वाघमारे, ओम नाईकवाडी मराठा समाजातील लोक उपस्तिथ होते. मध्यवर्ती शिवजयती समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, नंदकुमार गवारे,खंडू राऊत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला
मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, भारतीय मराठा महासंघ, महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटना, तुळजाभवानी पुजारी मंडळ, वडार संघटना, तुळजापूर तालुका पेट्रोल पंप संघटना या संघटनानी मराठा उपोषणाला पाठिंबा दिला.