नागरिकांची गस्त थांबाविण्याचे दिले, शहरात चोऱ्या नाहीत- अफ़वा थांबवा
पुरावे असतील तर तक्रार द्या , तपास करू -पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत
उस्मानाबाद – समय सारथी
नागरिकांची रात्रीची गस्त थांबविण्याचे आदेश सर्व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दैनिक समय सारथीशी बोलताना स्पष्ट केले
नागरिकांना संरक्षण व गस्त घालण्याचे कोणत्याही प्रकरणे प्रशिक्षण नसते त्यामुळे त्यांनी असे प्रकार करू नये, विनाकारण नागरिक एकाच वेळी एकत्र आल्यास कायदा व सुव्यवस्था स्तिथी निर्माण होऊ शकते.काही नागरिक सुद्ध रात्री कामानिमित्त बाहेर जात असतात अश्या वेळी त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे रात्रीची नागरिकांची गस्त बंद करावी असे आदेश दिले आहेत. पोलीस त्यांचे काम करित आहेत. खासगी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक हे काम करू शकतात.
7 फेब्रुवारी नंतर कोणतीही जबरी चोरी झालेली नाही,रात्रीची घरफोडीच्या 1 घटना एका महिन्यात घडल्या आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
प्रत्यक्षदर्शी कोणीही चोर पाहिलेले नाही, सर्व नागरिक हे एकमेकांच्या एकीव माहितीवर अफ़वा पसरवीत आहेत. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या चोरीतील 2 आरोपी पकडले आहेत. चोर शहरात धुमाकूळ घालत आहेत हे प्रत्यक्षदर्शी कोणीही पाहिले नाही किंवा तसा पुरावा नाही.
शहरात चोर फिरत असल्यास किंवा चोरी झाली असल्यास त्याबाबत पुराव्यासह लेखी तक्रार द्यावी जेणेकरून त्याचा पोलीस तपास करता येईल असे आवाहन कॉवत यांनी केले.
उस्मानाबाद शहरात 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या काळात 2 जबरी चोऱ्या ,1 घरफोडी व 9 चोऱ्या झाल्या आहेत तर 8 फेब्रवारीनंतर वाढत्या पेट्रोलिंग व प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे एकही चोरी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक कॉवत यांनी केले आहे.
मग काय चोरी होण्याची वाट पाहायची का साहेब, तरुण लोक गल्ली बोलात् गस्त घालत आहेत त्यामुळे चोरि होत नाही कुठे तुमचे पोलीस लोक कुठे आणि कसे ग्स्स्त् घालतात हे तुम्हाला चांगले माहित आहे
Kashach kay…..amhi yetoy police station la sahebanna bhetayla puravya sahit….chor kashe firtayet te dakhvayla