शिवसंपर्क अभियानाचा झंझावात – उस्मानाबाद शहरात 13 ठिकाणी बैठका, सभा
उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी 2 वर्षात 300 कोटींचा विक्रमी निधी, पुन्हा शिवसेनेला सत्ता द्या
नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहराच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची राज्यात सत्ता असताना 2 वर्षात तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मिळाला असून यामुळे शहराचा चेहरा बदलला आहे, विकासाची कामे करण्यासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाला विजयी करित सत्तेची संधी द्या असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी शिवसंपर्क अभियानात केले. आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असल्याने उस्मानाबाद नगर परिषदेला विक्रमी निधी मिळाला आहे त्यामुळे अनेक विकास कामे झाली आहेत. मुंबईत ज्याप्रमाणे शिवसेना शाखेत काम त्याच, जनतेचे प्रश्न समस्या सोडविल्या जातात त्याच धर्तीवर उस्मानाबाद शहरात सुद्धा शाखा व शाखाप्रमुख यांना जबाबदारी देत संघटन बळकट करित लोकहिताची कामे करावीत असे आवाहन निंबाळकर यांनी केले.
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट ल बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून उस्मानाबाद शहरामथ्ये 13 ठिकाणी शिवसंपर्क अभियानाची मोहिम राबविण्यात आले. शिवसेनेचे नेते तथा उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद शहरामथ्ये पुढील प्रमाणे शिवसंपर्क अभियानाच्या बैठक घेण्यात आल्या याला शिवसैनिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उस्मानाबाद शहर मध्ये दत्त नगर, तांबरी विभाग, गणेश नगर, खॉजा नगर, मा नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर यांच्या कार्यालयात,समता नगर,निंबाळकर गल्ली,विकास नगर, बँक कॉलनी, शिवरत्न चौक, भिम नगर, मा.शिवसेना शहरप्रमुख श्री प्रविण कोकाटे यांच्या कार्यालय या ठिकाणी उस्मानाबाद येथील शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदिप निकम व शामराव पाचंगे यांनी शहरातील उपस्थित पदाधिकाऱ्यांसह, शिवसैनिकांना योग्य ते मार्गदर्शक केले
याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे, गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, नगरसेवक सुरज साळुंके, नगरसेवक राणा बनसोडे, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, रवींद्र वाघमारे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, प्रविन कोकाटे,रोहित निंबाळकर, दत्ता बंडगर, दिपक जाधव, पंकज पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर, अफरोज फिरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद , अजय नाईकवाडी, विनोद केजकर,रवी कोरे आळणीकर, अभीराज कदम, गणेश राजेनिंबाळकर,बंडु आदरकर,संकेत सुर्यवंशी, प्रविण केजकर, अजय धोंगडे, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, राम साळुंके, संदीप बनसोडे, निलेश साळुंके, दिनेश बंडगर, सत्यजित पडवळ, सॅडी गायकवाड, राम बनसोडे आदींसह शेकडो शिवसैनिक,महिला माता भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.