परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परंडा येथील कोटला मैदानात महाविजय संकल्प सभा घेणार आहेत. भुम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सावंत साहेब यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री स्वतः येत आहेत त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या भव्य जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवसैनिक यांच्यात जल्लोषाचे वातावरण असुन तयारी पुर्ण झाली आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे आरोग्यमंत्री झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह भुम, परंडा, वाशी या भागात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आला असुन यातून अनेक लोकोपयोगी विकास कामे झाली आहेत. 2019 ला विक्रमी मतांनी निवडुन आल्यानंतर 2024 पर्यंतच्या 5 वर्षाच्या काळात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी विकासासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे महत्वाचे काम केले. मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर आता 2029 पर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना मंत्री सावंत यांनी मांडली आहे .
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोर्यातील 7 टीएमसी पाण्याची कामे अंतीम टप्प्यात आली असुन जेऊर बोगद्यासह अन्य ठिकाणची 90 टक्के कामे झाली असुन गुढीपाडव्यापर्यंत पाणी येणार आहे. शेतकर्यांसाठी उपसा सिंचन समिती स्थापन करुन पाणी आल्यापासुन 5 वर्ष काळात येणारे प्रतीवर्ष 11 कोटी प्रमाणे 5 वर्षाचे 55 कोटी वीजबील भैरवनाथ साखर कारखाना भरणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केल्याने दिलासा मिळणार आहे.
संकल्प निरोगी महाराष्ट्राचा असा नारा देत 24 महिन्यात 42 निर्णय घेतले असुन अमुलाग्र बदल केले आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, गर्भवती माता व नवजात बालकांसाठी वातसल्य योजना राबविली यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. व्यसनमुक्तीसाठी मोहीम राबवली. सिंचन, आरोग्य, रस्ते, उद्योग यासह अन्य क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी स्वखर्चातुन भुम परंडा वाशी तालुक्यातील शाळांना 150 डिजिटल बोर्ड दिले असुन सुमारे 400 पेक्षा अधिक शिक्षकांना ते डिजिटल बोर्ड वापरण्याचे प्रशिक्षण दिले. सिंचन, आरोग्य, रस्ते, उद्योग यासह अन्य क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले. विकास कामासोबत सामुदायिक विवाह सोहळे घेऊन 2 हजार लग्न लावत कन्यादान केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत शिक्षणाची व मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेऊन पालकत्व स्वीकारून मंत्री सावंत यांनी सामाजिक दायित्व सुद्धा पुर्ण केले आहे. मुलींना शाळेत जाता यावे यासाठी तब्ब्ल 1 हजार 500 सायकलींचे मोफत वाटप केले.
गाव तिथे स्मशानभुमी व दफनभुमी योजना राबविली. रस्ते प्रगतीचा मार्गदर्शन असल्याने सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक कामे केली. आरोग्य क्षेत्रात न भुतो न भविष्यती असे काम करुन त्यांनी इथल्या आरोग्य सुविधेचा दर्जा सुधारला. जनता दरबारच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना धीर दिला,रस्ते प्रगतीचा मार्ग असल्याने सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक कामे केली. विकास कामामुळे या भागातील दुष्काळाचा कलंक पुसण्यास मदत झाली असुन गतिमान रस्ते, वेगवान विकास, सिंचनाची समृद्धी म्हणजे विकासाचा सावंत पॅटर्न असेच म्हणावे लागेल.
भैरवनाथ शुगर सोनारी परंडा, भैरवनाथ शुगर शिवशक्ती वाशी व तेरणा शेतकरी साखर कारखाना ढोकी असे 3 कारखाने धाराशिव जिल्ह्यात यशस्वीपणे सुरु करुन ऊसाला विक्रमी भाव दिला तर रोजगार, व व्यवसाय उपलब्ध करुन दिले. क्रांती महिला उद्योग समुहाची स्थापना करुन त्या माध्यमातून जवळपास 20 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, या महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घरबसल्या काम मिळत असुन एक महिला साधारणपणे आठवड्याला 2 हजार तर महिन्याला 7 ते 8 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. सावंत यांनी स्वखर्चाने दुष्काळात दुष्काळग्रस्त भागात नागरिकांचे पिण्याचे हाल होत असल्याचे पाहून पाण्याचे टँकर सुरु केले तर जनावर यांच्यासाठी चारा छावणी सुरु केल्या