धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावरून वाद सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍड धीरज पाटील यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार देवानंद रोचकरी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. रोचकरी यांना समाजवादी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असुन सायकल हे त्यांचे चिन्ह आहे. रोचकरी हे त्यांचा प्रचार करीत असताना पॉम्पलेटवर महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा उल्लेख करीत आहेत तसेच काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनाचे उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटो वापरत आहेत तसेच सायकल या चिन्हावर मतदान करुन विजयी होण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणुन घोषित केले आहे, त्यांच्यासाठी माजी मंत्री अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचार सभा सुध्दा घेतली आहे, मतदार यांच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी रोचकरी हे महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचे भासवीत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी तक्रार धीरज पाटील यांनी केली आहे.
समाजवादी पार्टीकडुन उमेदवारी मिळाली आहे, तक्रार केलेले पॉम्पलेट हे कोण बनविले व कुठे वापरले हे माहिती नाही, तक्रारी अनुषंगाने उत्तर देऊ असा खुलासा रोचकरी यांच्या वतीने करण्यात आला.