धाराशिव – समय सारथी
मुलगी शिकली प्रगती झाली हे लक्षात ठेवुन राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत मुलींच्या शिक्षणाला व त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, मुलभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले. मंत्री सावंत हे स्वतः प्राध्यापक असल्याने त्यांना शिक्षण, शिक्षण व्यवस्था व त्यात येणाऱ्या अडचणी याची चांगली माहिती व जाणीव होती. त्यांनी स्वतःतील शिक्षक कायम जिवंत ठेवला. ग्रामीण भागात अनेक गावात दळणवळणाची साधने, बस वेळेवर येत नसल्याने मुलींना शाळेत नियमित व वेळेवर जाता येत नव्हते त्यातच मुलींना शाळेत पाठवण्याबाबत काही पालकांची नकारात्मक मानसिकता भर घालत होती, त्यामुळे मुलीचे शाळेतील उपस्थितीती व गळतीचे प्रमाण वाढत होते.
शाळेपासुन दुर राहणाऱ्या गावखेड्यातील मुलींना शाळेत जाता यावे यासाठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भुम परंडा वाशी य तालुक्यातील अनेक शाळेत तब्ब्ल 1 हजार 500 सायकलींचे मोफत वाटप केले. सायकली मिळाल्यामुळे सवित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळाला व मुलींची शाळातील उपस्थितीती कमालीची वाढली, वेळेत शाळेत पोहचता आल्याने त्यांचा वेळ वाचला व शैक्षणिक प्रगतीही दिसुन आली.
शाळेत उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करुन त्यांचा गौरव करण्यात आला.मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते, सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षणाला मंत्री सावंत यांनी प्राधान्य दिले व त्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. मुलींच्या वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय तर अंघोळीसाठी गरम पाण्यासाठी सोलर व्यवस्था स्वखर्चाने केली.