ठोस निर्णय, प्रत्यक्ष कृती – कायमस्वरूपी उपाय हेच मंत्री सावंत यांचे धोरण
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधासाठी तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असुन आरोग्य संस्था रुग्णालय, हॉस्पिटलला श्रेणीवर्धन, नवीन मंजुरी, इमारत दुरुस्ती, मशीन व इतर साहित्य आधुनिकीकरण रूपाने बळकटी मिळाली आहे. धाराशिव येथे नवीन 500 खाटाचे जिल्हा रुग्णालय, कॅथ लॅब, फिरता दवाखाना, मिशन आनंदी, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तालुक्यासह महाआरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत. आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शहरासह ग्रामीण भागात न भुतो न भविष्यती असे निर्णय घेतल्याने आगामी काळात आरोग्याच्या मुलभूत सुविधा मिळणार असुन नागरिकांचे आरोग्य सुधारणार आहे शिवाय आर्थिक बचत सुद्धा होणार आहे.
भुम येथे 60 बेडचे तर परंडा येथे 100 बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन भुम तालुक्यातील अंद्रूड, चिंचपुर, ढगपिंपरी, नागेवाडी, घारगाव, पाचपिंपळा, घाटनांदूर येथे विशेष बाब म्हणुन उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. वाशी व भुम येथील ग्रामीण रुग्णालयाचे 30 वरून 50 खाटांचे श्रेणीवर्धन तर परंडा उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटावरून 100 खाटा मंजुर केल्या. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात खाटांची बेड संख्या 60 वरून 100 इतकी करण्यात आली आहे तर मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजुर करण्यात आले आहे. वालवड, ईट, माणकेश्वर येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजुर, अनाळा व वाशी येथे ट्रामा केअर सेंटर मंजुर केले.
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी 1 हजार कोटींचा निधी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मंजुर केला आहे. नवा इतिहास, नवी सुरुवात असा नारा देत आरोग्यमंत्री सावंत यांनी राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सुविधासाठी अमुलाग्र निर्णय घेतले आहेत.खंबीर साथ दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. कॅथ लॅब, फिरता दवाखाना, मिशन आनंदी, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तालुक्यासह महाआरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत तसेच विविध शासकीय व नावीन्यपुर्ण योजनाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. या आरोग्य सुविधा व निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय सोय होणार आहे.कळंब, मोहा, भुम, परंडा, तेरखेडा यासह भागात आरोग्य सुविधा होणार असून स्वतंत्र स्त्री रुग्णालय देखील मंजूर करण्यात आले आहे.