कधी शाळेत, शेतातील बांधावर तर कधी गावातील पारावर – लेखाजोखा मांडत विकासाची संकल्पना
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी गेल्या काही महिन्यात गाव संवाद दौरा करुन नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांच्याशी थेट संवाद साधला, त्यांच्या गाव संवाद उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवाय लोकांना काय हवे आहे, त्यांच्या अडचणी याची माहिती पालकमंत्री यांना झाली. गावसंवाद दौर्यात पालकमंत्री ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय मुले यांच्यासोबत संवाद साधला असुन त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत त्या सोडविल्या. कधी शाळेत, शेतातील बांधावर तर गावातील पारावर जाऊन मंत्री सावंत हे संवाद साधत आहेत.
डॉ तानाजीराव सावंत हे मंत्री झाल्यापासुन धाराशिव जिल्ह्यात आरोग्य, सिंचन क्रांती झाली असुन करोडो रुपयांचा विकास निधी आला आहे, आजवर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आगामी काळात करायच्या विकासाची संकल्पना ते लोकांना सांगत आहेत. परंडा, वाशी व भुम मतदार संघात त्यांनी जनता दरबार घेऊन अनेक समस्या सोडविल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल ग्रामीण भागात महिला त्यांचे औक्षण करीत स्वागत करीत आभार मानत आहेत.
परंडा तालूक्यातील चिंचपुर, शेळगाव, धोत्री, सक्करवाडी, पांढरेवाडी, लंगोटवाडी, चिंचपूर, ताकमोडवाडी, जेकटेवाडी, देवगाव खुर्द, गोसावीवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या 12 गावांत त्यांनी नुकताच संवाद दौरा केला. विविध विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्वखर्चाने विकास कामे करून देणार असल्याची घोषणा यावेळी केली.जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, मा.जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके, जेष्ठ नेते अॅड. सुभाष मोरे, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, चिंचपुर ग्रामपंचायतीचे सरंपच डॉ. महेश देवकर, पंचायत समीतीचे माजी देवकर, अनिल सरपंच महादेव देवकर, प्रदिप पाटील, दत्ता कुलकर्णी, गणेश सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.