महाठगीचा कळस – 190 जणांच्या नावे 28 कोटींचे कर्ज उचलून परतफेडच नाही, अनेकजण कर्जात बुडाले
वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या दंडनाईक यांचा घोटाळा – ठेवीदारांचा विश्वासघात करून बँक बुडविली
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन, व्यवस्थापक यांनी संगणमत करून 190 जणांच्या नावे 2008 ते 2014 या कालावधीत जवळपास 28 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले. त्या कर्जाची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी स्वत:च्या जयलक्ष्मी या खाजगी साखर कारखान्यासाठी वापरली असल्याची माहिती आहे. त्या कर्जाची वसुलीच केली नाही, वसुलीसाठी काहीही प्रयत्न केले नाहीत त्यामुळे बँक संकटात सापडली तर अनेक जण कर्जत पुरते बुडाले असुन त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
रिझर्व्ह बँकेने वसंतदादा बँकेचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या. ठेवीदार पतसंस्थेने दिलेल्या फिर्यादीवरून वसंतदादा बँकेचे तत्कालिन चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यावर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित संशयित आरोपींनी अटकपुर्व जामिन मिळावा, म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून गुरूवारी 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
वसंतदादा बँकेच्या तत्कालिन संचालक मंडळातील काही संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार करून बँक बुडायला सर्वस्वी चेअरमन विजय दंडनाईक हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु तत्कालीन डीडीआर यांनी चेअरमन विजय दंडनाईक यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. दंडनाईक यांना अटक केल्यावरच अनेक कारनामे समोर येणार आहेत.
चेअरमनच्या सेव्हींग खात्यावर ओव्हर ड्राफ उचलणे, कर्जदारांना वाटप केलेली कर्जाची रक्कम नियमबाह्यपणे स्वत:च्या बचत खात्यावर वर्ग करून घेणे, थकीत कर्जदारांना वसुलीच्या नोटीसा निघू न देणे, वसुली करू नये म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यावर दबाव आणणे, स्वत:च्या खाजगी जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या लाभासाठी बँकेतून कर्ज घेऊन अडचणीत आणणे, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांनी तपासणीवेळी केलेल्या सुचनांचे पालन न करणे, त्रुटीची पुर्तता न करणे, अशी नियमबाह्य कामे केली आहेत.
संशयित १९० कर्जदारांची यादी डीडीआर यांना सादर करून कारवाई करण्याची मागणी काही संचालक यांनी केली आहे. यातील काही जणांनी तक्रार केली आहे तर काही जणांनी तक्रार नसल्याचे म्हण्टले आहे.
कर्जदारामध्ये दत्तात्रय निवृत्ती देशमुख (९ लाख), निर्मला अनंत शिंगाडे (१६ लाख), रामकिसन अप्पा मोरे (१० लाख), नवनाथ तात्या आदटराव (१० लाख), अरूण रामभाऊ जाधव (१० लाख), खंडेराव रामराव पाटील (७ लाख), गुणवंत जोतीराम पाटील (१७ लाख), अनिता जगदिश माळी (१२ लाख), गुणवंत धोंडीबा वाकुरे (५ लाख), श्रीमंत किसन गायकवाड (७.५० लाख), इसा बाजीराव शिंदे (५ लाख), पंढरी विठोबा जाधव (११ लाख), प्रभाकर हरिश्चंद्र घुटे (२७ लाख), शिवाजी सोपान हालकरे (१२ लाख), रामचंद्र श्रीमंत गायकवाड (५ लाख), मधुकर घुटे (१० लाख), गोरोबा श्रीपती देटे (१३ लाख), मुकूंद माणिक कुंभार (१० लाख), अविनाश गरड (१० लाख), मनोज प्रताप खराडे (६ लाख), संगिता शिवाजी जाधव (१३ लाख), महेश भगवान कोल्हाळ (१५ लाख), शिवाजी देवीदास गौरकर (४० लाख), अशोक शंकर शेंडगे (११ लाख), भालचंद्र यशवंत घुटे (४.५०), रणजीत सदाशिव घुटे (१० लाख), शालीवाहन उद्धव लोमटे (५ लाख), अच्युत गोरोबा शेंडगे (१२ लाक), अर्जुन विष्णू गवाड (६ लाख), भारत रंगनाथ हालकरे (१८.५० लाख), प्रवीण प्रभाकर घुटे (११.५० लाख), पवन हरिश्ंचद्र ढेकणे (४ लाख), नागेश हरिश्ंचद्र ढेकणे (४ लाख), आंबऋषी दिगंबर नाकुडे (२ लाख), धर्मेंद्र राजेंद्र घुटे (७ लाख), रामराजे महादेव देटे (९.५० लाख), श्रीमंत सखाराम कसबे (२० लाख), राजेंद्र शंकर कसबे (१८ लाख), अण्णासाहेब पांडुरंग घुटे (८ लाख), नारायण किसन जगताप (८.५० लाख), लक्ष्मण विश्वनाथ घुले (१३.५० लाख), साईराज मशिनरी स्टोअर्स (६० लाख), शिवगणेश ट्रेडर्स (६० लाख), एस. आर. ट्रेडींग कंपनी (६० लाख), श्रीकृष्ण ट्रेडर्स (६० लाख), सागर मशिनरी (६० लाख), यशवंत पेंटस (६० लाख), व्यंकटेश इंजिनिअरींग वर्क्स (६० लाख), अश्विनी केमीकल (६० लाख), अजित टुल्स अॅन्ड हार्डवेअर (६० लाख), साई समर्थ ट्रेडींग कंपनी (६० लाख), इंडिया स्टील अॅन्ड हार्डवेअर (६० लाख), मारूती अंबादास सोनवणे (२० लाख), सतीश मोहन घुटे (१२ लाख), जनक पांडुरंग घुटे (५ लाख), शहाजी आप्पाराव मोरे (१५.५० लाख), भगवान किसन देटे (१८ लाख), बाळासाहेब सदाशिव घुटे (६.५० लाख), रघुजी विश्वंभर शेंडगे (२० लाख), बाळू खंडू जाधव (४.५०), रामलिंग आप्पा मोरे (१५.५०), विलास त्रींबक शेंडगे (१० लाख), अरूण देवीदास वाघमोडे (५.५० लाख), भीमा शिवराम दंडनाईक (१०.५०), बब्रुवान बाजीराव दंडनाईक (१० लाख), अनिल शिवाजी दंडनाईक (६ लाख), अनिल देवीदास निकम (६ लाख), रणधीर किसन घुटे (१४ लाख), नवनाथ पांडुरंग धुमाळ (१३ लाख), रोहीत भास्कर दंडनाईक (१६.५० लाख), रविकांत रामभाऊ काळे (१२.५० लाख), उद्धव विठ्ठल हालकरे (५ लाख), शहाजी कोंडीबा मुंडे (१६ लाख), दत्तात्रय देवीदास भोसले (१५ लाख), शोभा राजेंद्र काळे (५.५० लाख), सुधाकर प्रभाकर एकंडे (२५ लाख), निता प्रकाश देशमुख (१० लाख), योगेश दत्तात्रेय भोसले (३५ लाख), अंबादास दिगंबर माळी (३ लाख), रेखा वसंत दसवंत (३ लाख), हणमंत नागनाथ हिंगमिरे (१४.५० लाख), राजाराम मारूती पाटोळे (१३.५० लाख), गोवर्धन मारूती बोंदर (१७ लाख), बाळासाहेब सदाशिव घुटे (२० लाख), आदी कर्जदारांचा समावेश आहे.