मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहायक यांच्यावर गोळीबार
अहमदनगर – समय सारथी
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय सहाय्यकावर करण्यात झाल्याची घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील लोहगाव जवळची ही घटना असून काल ( शुक्रवारी ) रात्री गोळीबार झाला. अज्ञात 5 जणांच्या टोळक्याने हा गोळीबार केला आहे. राजळेच्या पोटात गोळी घुसली असून त्यांच्यावर अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.राहुल राजळे यांची प्रकृती सध्या स्थिर असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. हल्लेखोरांचा पोलीसांकडून तपास सुरु आहे.