सलोखा राखण्याचा हिंदू मुस्लिम बांधवाचा संकल्प – उस्मानाबाद येथे शांतता समितीची बैठक संपन्न
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण व आगामी काळात असलेले हिंदू मुस्लिम धर्मीयांचे सण या अनुषंगाने उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या नेतृत्वात शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदू आणी मुस्लिम बांधवानी जातीय व सामाजिक सलोखा राखण्याचा संकल्प केला तसेच कोणी काहीहीही राजकीय , धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले तरी सामाजिक शांतता राखण्याचा निर्धार केला. आगामी काही दिवसात ईदसह अक्षय तृतीया हे सण आहेत तर भोंगा सारख्या विषयाने राजकीय वातावरण तापले आणी, त्यात भाईचारा राखण्याचा निर्धार केला. उस्मानाबादकरांना शांतता हवी आहे आणी प्रत्येक धर्मात शांततेला प्राधान्य आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन उस्मानाबाद शांत ठेवण्याचा संकल्प यावेळी केला. सर्वांनी पोलिसांनी दिलेल्या सूचना व कायद्याचे पालन करावे असे या बैठकीत ठरले.
बैठकीस जिल्हा पोलीस उपअधीक्षक कल्याण घेटे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल, आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, शांतता कमिटीचे विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, भारत इंगळे, प्रवीण कोकाटे, विजय मुद्दे, संजय मुंडे, मसूद शेख, खलील सय्यद, समीयोद्दीन मशायक, अभय इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर, विष्णू इंगळे, ओम नाईकवाडी, कुणाल धोत्रीकर, वैभव हंचाटे, शैलेश कदम, मुफ्ती रहेमतुल्ला, मौलाना आयुब, मौलाना अहमद, अॅड. परवेज काझी, सजीयोद्दीन शेख, कादर खान, आयाज शेख, इस्माईल शेख यांच्यासह हिंदु-मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.