प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाचा फायदा
भुम – समय सारथी
ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चातुन भुम परंडा वाशी तालुक्यातील शाळांना डिजिटल बोर्ड दिले आहेत. तालुक्यातील खेड्यापाड्यातील शाळांना स्वखर्चातून 150 डिजिटल बोर्ड दिले असुन सुमारे 400 पेक्षा अधिक शिक्षकांना ते डिजिटल बोर्ड वापरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होताना दिसत आहे.
हिंदी, गणित, मराठी, इतिहास हे विषय समजुन घेण्यासाठी सोपे होत आहे. डिजिटल बोर्ड मुळे मुलांचे शाळेत जाण्याचे आकर्षण वाढले आहे. शालेय मुलांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी समजुन घेण्यासाठी पालकमंत्री डॉ सावंत यांनी स्वतः शाळेत जात मुलांशी संवाद साधला, सावंत हे स्वतः प्राध्यापक असुन त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील होणारे बदल, विद्यार्थी यांच्या समोर असणारी भावी आव्हाने माहिती असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा या भागातील शिक्षण व्यवस्था सुधारायला होत आहे.