खासदार ओमराजे तुपाशी,शेतकरी उपाशी
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतात एक्सप्रेस फिडर वरून 24 तास वीज , शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास लोड
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी वीज लोड शेडींगने हैराण झालेला असताना उस्मानाबाद जिल्हायचे शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. तेर येथील एक्सप्रेस फिडरवरून डिपी टाकण्यात आला असून या फिडरच्या माध्यमातून ओमराजे यांच्यासह काही शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात आहे तर त्याच भागातील शेतकऱ्यांना मात्र वीज मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान् होत आहे. लोकप्रतिनिधी व सामान्य शेतकरी असा दुजाभाव होत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.
आम आदमी पार्टीने आज ओमराजे यांना 24 तास वीज मिळत असल्याचा आरोप आम आदमीने केला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी वीज नसल्याने वैतागला आहे, शेतात पाणी असले तरी केवळ वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, दिवसरात्र विजेची वाट पाहावी लागत आहे. सामान्य शेतकरी यांनी ही विजेसाठी बिकट अवस्था असताना शिवसेनेचे खासदार ओमराजे यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. तेरणा साखर कारखानासाठी असलेल्या विशेष एक्सप्रेसवरून वरील डिपी वरून ओमराजे यांच्या शेतात वीज कनेक्शन देण्यात आला असून या फिडरला 24 तास वीज असते शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास वीज मिळते.
खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी स्तिथी असून या दुजाभाव मुळे शेतकरी वैतागला आहे तर खासदार ओमराजे यांचे प्रकरण असल्याने अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करित आहेत. एक्सप्रेस फिडर हे तेरणा कारखाना, पाणी पुरवठा योजना यांच्यासाठी असते मात्र खासदार ओमराजे यांना या फिडरचा विशेष लाभ दिल्याचा आरोप आपचे जिल्हाध्यक्ष खोत यांनी केला आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड अजित खोत, तालुका उपाध्यक्ष राजपाल देशमुख यांच्यासह ढोकी, गोवर्धनवाडी, रुई, खामगाव, कावळेवाडी, बुकनवाडी या भागातील शेतकऱ्यांनी आज ढोकी येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोड शेडींग च्या दुजाभाव बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान याबाबत खासदार ओमराजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले.