धाराशिव – समय सारथी
जात वैधता प्रमाणपत्रासाठी 19 हजार रुपयांची लाच घेताना एकास धाराशिव लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील आरोपी लोकसेवक शिपाई सागर अशोक क्षीरसागर याला 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन 19 हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे पुतण्याचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणे करिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय धाराशिव येथे प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी साहेबांकडुन करुन घेवुन जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 19 हजार लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे आनंद नगर जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी म्हणुन सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस-अमलदार दिनकर उगलमुगले, नेताजी अनपट, गणेश जाधव, सचिन शेवाळे व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.