भुम – समय सारथी
पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी असा नारा देत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची रॅली संपन्न झाली या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत महिलांची मोठी संख्या होती. शासकीय दुधसंघ परांडा रोड भुम येथून महारॅलीला सुरुवात झाली त्यानंतर फ्लोरा चौक,ओंकार चौक, तहसील कार्यालय, एस.टी. स्टॅन्ड गोलाई चौक, लक्ष्मी रोड, अण्णाभाऊ साठे चौक येथे रॅली आली त्यानंतर नगरपालिका समोर जाहीर सभा संपन्न झाली.पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना परंडा मतदार संघातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. कार्यकर्ते यांनी भगवा खांद्यावर घेत शिवधनुष्य हाती घेत विजयाचा संकल्प केला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मतेq पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती. सावंत हे आजवरच्या जिल्ह्याच्या इतिहास 1 लाख पेक्षा अधिक मते घेणारे एकमेव आमदार आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत 3 लाख 30 हजार 402 मतदार असुन त्यात 1 लाख 74 हजार 761 पुरुष व 1 लाख 54 हजार 836 स्त्री मतदार आहेत. 2019 च्या तुलनेत 16 हजार 465 मतांची भर पडली आहे.