शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार –
परंडा – समय सारथी
सर्वसामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली असुन मी जनतेच्या मनातील मंत्री व आमदार आहे. जनतेच्या आग्रहाखातर आज एक उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. भुम परंडा वाशी येथील शेतकरी, मतदार, माता भगिनी माझ्या पाठीशी असुन विजय निश्चित असल्याचे पालकमंत्री डॉ सावंत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुष्प अर्पण करुन त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यावेळी गिरीराज सावंत उपस्थितीत होते. महाविकास आघाडीचे 2 फॉर्म दाखल झाले आहेत. त्यांनी त्याच्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन केले आहे. आज आम्ही अर्ज दाखल करीत आहोत,ती गर्दी पाहून विजयावर आजच शिक्कामोर्तब होईल असे सावंत म्हणाले.
भूम परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ तानाजीराव सावंत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे व उबाठाचे रणजीत पाटील अशी तिरंगी लढत आहेत. उमेदवारीवरून सुरू असलेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा मधील वाद हा त्यांचा अंतर्गत वाद आहे .मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले.
शासकीय दुधसंघ परांडा रोड भुम येथून महारॅलीला सुरुवातील होईल,फ्लोरा चौक,ओंकार चौक, तहसील कार्यालय, एस.टी. स्टॅन्ड गोलाई चौक, लक्ष्मी रोड, अण्णाभाऊ साठे चौक व त्यानंतर नगरपालिका समोर जाहीर सभा होईल.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे, शिवसेना पक्षात सावंत यांच्या हस्ते विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांत सहभागी होत प्रवेश करीत आहेत.या कार्यकर्ते यांनी भगवा खांद्यावर घेत शिवधनुष्य हाती घेत विजयाचा संकल्प केला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.