धाराशिव – समय सारथी
काँग्रेस पक्षाने ऍड धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पक्ष श्रेष्टी यांनी माझ्यावर अन्याय केला असे सांगत त्यांनी कार्यकर्ते व समर्थक यांच्या आग्रहास्तव तुळजापूर विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चव्हाण हे अपक्ष निवडणुक लढविणार आहेत. कार्यकर्ते यांची एक बैठक काल रात्री संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्ते, माझे समर्थक जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल. 60 वर्ष मी काँग्रेस पक्षात राहून सेवा केली मात्र पक्षाने मला जाणीवपूर्वक उमेदवारी दिली नाही. काही जणांनी राजकीय षडयंत्र रचले त्यांची नावे मी योग्य वेळी उघड करेल. 70 टक्के पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मला पाठिंबा आहे, त्यांचा कौल जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले.












