मराठा आरक्षण मागणी व लढ्यात जरांगे यांच्या बाजुने – भुमिका स्पष्ट
धाराशिव – समय सारथी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होताच आमदार कैलास पाटील यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षण मिळण्यासाठी उभे करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार कैलास पाटील यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांनी अनेक मोर्चात व आंदोलनात मराठा सेवक म्हणुन जबाबदारी पार पाडली आहे. यापुढेही मराठा आरक्षण लढा व मागणीसाठी जरांगे यांच्या बाजूने असल्याची भुमिका पाटील यांनी मांडली.
गेल्या पाच वर्षांत धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावत धाराशिव-कळंबवासियांचा विश्वास सार्थ ठरवता आला, त्यांच्या या विश्वासाला पात्र राहत आगामी काळातही आपण अतिशय कर्तव्य दक्षतेने आणि प्रामाणिक पणे कार्यरत राहू आणि त्यासाठी धाराशिव-कळंबची जनता नेहमीप्रमाणे या वेळीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला.
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात कैलास घाडगे पाटील यांना 87 हजार 488 मते पडली होती तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना 74 हजार 21 मते पडली होती, कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले होते. सत्ता परिवर्तन वेळी त्यांनी मातोश्रीप्रति निष्ठा जपली.