आठवणींना उजाळा – डॉ पदमसिंह पाटील यांनी शरद पवारांना दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही
डॉ पदमसिंह पाटील व शरद पवार कुटुंबाचे ऋणानुबंध अनेक वर्षाचे – खा सुप्रिया सुळे
उस्मानाबाद – समय सारथी
सुप्रिया सुळे यांच्याकडून डॉ पदमसिंह पाटील यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला, सुळे ह्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी तेर येथील संत गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी बोलताना सुळे यांनी पवार – पाटील कुटुंबाच्या आठवणीना उजाळा दिला.
डॉ पदमसिंह पाटील व शरद पवार यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे आहेत. शरद पवार यांच्या चांगल्या वाईट काळात डॉ पदमसिंह पाटील यांनी पाठीशी उभे राहत साथ दिली. डॉ पाटील यांनी दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही असे सांगत सुळे यांनी डॉ पाटील यांच्या विषयी आदर व्यक्त केला. तेर हे अजित पवार यांची सासुरवाडी असल्याने नाते घट्ट आहे.
डॉ पदमसिहं पाटील यांनी पवारांची साथ सोडत भाजप प्रवेश केला आहे त्यानंतर दोन्ही परिवारात कटुता आली होती मात्र सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिल्याने त्याची चर्चा झाली.
तेर येथील संत गोरोबा काका मंदिर व तेरचा म्हणवा तितका विकास झाला नाही, मंदिर परिसरात जी दुरावस्था झाली आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही असा टोला त्यांनी यावेळी लागावला. अजित पवार यांची तेर ही सासरवाडी आहे, त्यामुळे इथे विकास झाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार विक्रम काळे, राहुल मोटे, जीवनराव गोरे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, वैशाली मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, रमेश बारस्कर, रेवनसिद्ध लामतुरे प्रतापसिंह पाटील उपस्तीथ होते.