नाराजी नाट्य – मुस्लिम समाजाच्या नगरसेवक व कार्यकर्ते यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या व्यथा
उस्मानाबाद – समय सारथी
सुप्रिया सुळे यांच्या उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान नाराजी नाट्य पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांचा ताफा मुस्लिम समाजाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अडवला. राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यथा मांडल्या.
सुप्रिया सुळे यांनी नाराज कार्यकर्ते यांना स्वतःच्या गाडीत बसविले व त्या स्वतः दुसरी गाडीत बसल्या आणी जिल्हा परिषद येथे कार्यक्रमासाठी गेल्या तिथे त्यांनी जमिनीवर बसत कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
मुस्लिम समाजाला सुप्रिया सुळे यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्याने नाही, एक ही कार्यक्रम किंवा कार्यकर्ते यांच्या घरी न नेण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले. सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या एकही धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. सुळे ह्या गोरोबा काका, हातलादेवी व तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत मात्र मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट दिली नाही.
सुप्रिया सुळेकडून कार्यकर्त्यांनीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतील गटबाजी जाणवली.