नामकरणाची फाईल पूर्ण झाल्याची खैरे यांची माहिती , मुख्यमंत्री 8 जूनला औरंगाबाद येथील सभेत घोषणा करणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादच धाराशिव व औरंगाबादच संभाजीनगर नामकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कागदपत्र व संपूर्ण फाईल तयार झाली आहे एखादा दिवशी घोषणा होईल अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उस्मानाबाद येथे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार आहेत, आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजी नगर म्हणतो, आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण असून असे खैरे म्हणाले.
खैरे यांनी नामांतरणची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने 8 जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत नामकरणची घोषणा करणार का याची चर्चा होत आहे.
बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले होते , कशाला हवा हा औरंग्या , त्याने मंदिरे तोडली सभाजी महाराज यांना त्रास दिला मग त्याचे नाव कशाला ? तेव्हापासून आम्ही संभाजीनगर म्हणतो.