उस्मानाबादचे सुपुत्र ऍड अमित मुंडे यांची सीबीआयच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादचे सुपुत्र ऍड अमित किशोरराव मुंडे यांची सीबीआयच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे सचिव संजय कुमार चौरसिया यांनी नियुक्तीचे पत्र सीबीआयचे संचालकांना दिले आहे. मुंडे यांनी आजवर आयकर विभाग, कस्टम विभागात शासकीय अभियोक्ता म्हणून यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली आहे. मुंडे यांची सीबीआयच्या विशेष सरकारी वकील पदी नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती आगामी 3 वर्षांसाठी असणार आहे, ते सीबीआयच्या विविध विभागातील कामात सरकारची मुंबई उच्च न्यायालयासह महाराष्ट्रातील इतर प्रकरणात बाजू मांडणार आहेत. त्यांची ही नियुक्ती ही उस्मानाबादकरांसाठी अभिमानास्पद असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
मुंडे हे मागील पाच वर्षापासून आयकर विभाग केंद्रशासन यांचे विशेष प्रोसेक्युट म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्रशासनाने त्यांना सीबीआय वरती बढती दिली आहे त्यांनी आत्तापर्यंत हाताळलेल्या केसेस पैकी मुंबईचे नामवंत फिल्म नामवंत फिल्म प्रोडूसर फिरोज नाडियादवाला यांना जेल करण्यामागे त्यांचा सिंहाचा हात आहे त्याचप्रमाणे मुंबई येथील सोन्याचे व्यापारी नामांकित बिल्डर यांना देखील मुंडे यांनी जेलची हवा दाखवलेली आहे. अमित मुंडे यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे केंद्र शासनाचाला करोडो रुपयांचा कर वसूल करण्यात यश मिळाले आहे. मुंडे यांचा कायद्याचा सखोल अभ्यास व त्यांचे व्यक्तिमत्त्व याची दखल घेऊन त्यांच्यावरती सीबीआयने खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. काही दिवसापूर्वीच सेंट्रल जीएसटी व सेंट्रल नारकोटिक्स डिपार्टमेंट यांचाही ॲडिशनल चार्ज आलेला आहे त्यांची नियुक्ती कस्टम विभागामार्फत मागील सहा महिन्यापूर्वी करण्यात आली आहे ते सध्या इन्कम टॅक्स विभाग कस्टम विभाग व नारकोटिक्स डिपारमेंट केंद्र शासन डीआरआय या विभागातील त्यांची उल्लेखनीय कामगिरी कामगिरीची नोंद घेऊन भारतातील सर्वोच्च एजन्सीने त्यांना त्यांचे विशेष वकील म्हणून नेमलेले आहे ही आपल्या जिल्ह्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे. दैनिक समय सारथी परिवाराकडून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.