कारागृहात रवानगी – कळंबच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांचे 22 लाखांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरण
उस्मानाबाद – समय सारथी
22 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कामाविल्या प्रकरणी कळंबच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पाटील यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन अटक केल्यानंतर त्यांना उस्मानाबाद येथील न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जून रोजी सोमवारी होणार आहे. आरोपी पाटील यांच्या वतीने ऍड अमोल वरुडकर यांनी कोर्टात बाजू मांडली.
वैशाली पाटील ह्या तहसीलदार असताना त्यांनी उत्पन्नपेक्षा जास्त अशी 22 लाख रुपयाची बेहिशोबी मालमत्ता कामाविली त्यांनी 29 टक्के अधिक संपत्ती कामाविल्याने त्याच्यावर अपसंपदेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैशाली पाटील यांच्या तक्रारी आल्या होत्या. 2008 ते 2016 या काळातील त्यांच्या ज्ञात व कायदेशीर मार्गाने कामाविलेल्या संपत्तीचे निरीक्षण करण्यात आले. त्यात 22 लाखांचे अधिक उत्पन्न सापडले, त्यामुळे पोलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक हुलगे करीत आहेत.