नॉट रिचेबल – शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले संपर्काबाहेर
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल झाले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्री पद न मिळाल्याने चौगुले हे नाराज होते तर त्यांना नेहमी डावलन्यात आले असल्याचे नेहमी दिसलें आहे. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद असून ते काल पासून इतर आमदार यांच्या संपर्क बाहेर आहेत.
चौगुले हे संपर्काबाहेर असल्याने ते एकनाथ शिंदे सोबत आहेत की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.
शिवसेनेचे उपनेते तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत याचा ही फोन बंद आहे, नुकतेचे सावंत यांनी घरी बसेल पण शिवसेना सोडणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या शिवसपर्क अभियान दरम्यान केले होते.