शिवसेनेकडून कैलास पाटील यांचा सत्कार – मुंबईत प्रसार माध्यमासमोर मांडला सुटकेचा थरार
शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे बंडखोर शिंदे गटाच्या तावडीतून सुटून शिवसेनेच्या गटात सुखरूप आल्याने त्यांचा मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या वतीने पत्रकार परिषद पूर्वी सत्कार करणाऱ्यात आला. खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्यासह नेत्यांनी कैलास पाटील यांचा सत्कार करुन त्यांनी दाखविलेल्या धाडसबद्दल कौतुक केले. कैलास पाटील यांच्या एकनिष्ठपणाचे राज्यभर शिवसैनिकांतून कौतुक होत आहे.
==========
शिंदेच्या तावडीतून असे निसटले शिवसेना आमदार कैलास पाटील …. गाठले मातोश्री, एकनिष्ठ आमदार
उस्मानाबाद – समय सारथी
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत येथे जाऊन नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे, शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन सत्तातर करण्याचा मनसूबा शिंदे यांचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले हे शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत.
शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे सुद्धा शिंदेच्या गळला लागले होते मात्र शिंदेचा मनसुबा व डाव कळताच पाटील ते मोठ्या शिताफिने त्यांच्या तावडीतून निसटले व अनेक संकटावर मात करीत मातोश्रीवर दाखल झाले. कैलास पाटील यांची शिवसेना व ठाकरे कुटुंबा प्रति असलेली एकनिष्ठा या निमित्ताने समोर आली आहे.
उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात ओढून सुरतला नेण्याचा प्रयत्न केला मात्र ते हुलकवणी देत वाटेतुन निसटले, जीव धोक्यात घालून कैलास पाटील त्या सर्वाना गुगारा देत रात्रीतून निघाले, गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका चेंक नाक्यावरून भर पावसात 4 किमी पायी आले त्यानंतर मिळेल त्या गाडीने मुंबई गाठली. पायी दुचाकी ट्रक असे मिळेल ते वाहन घेऊन कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली. खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेत्यांना सांगितला.
शिंदे यांनी केलेला प्रकार व त्यांच्या बाबत घडलेले प्रसंग कैलास पाटील यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून सांगितले आहेत. शिंदे हे अनेक आमदारांना बळजबरीने घेऊन गेल्याचा आरोप होत आहे त्याला पुष्टी देताना खासदार संजय राऊत यांनी कैलास पाटील यांच्यावर घडलेला प्रसंग सांगितलं आहे.