बंडखोर शिवसेनेच्या आमदारांचा पहिला फोटो समोर – डॉ तानाजी सावंत यांच्यासह ज्ञानराज चौगुले फुटल्यावर शिक्कामोर्तब
सावंत यांना सुरत येथे हॉटेलमध्ये धक्काबुक्की व मारहाण झाल्याची चर्चा – फोटोत 32 आमदार
उस्मानाबाद – समय सारथी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा पहिला फोटो समोर आला असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत व ज्ञानराज चौगुले यांचा समावेश आहे. सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत पहिल्या रांगेत बसले आहेत तर चौगुले हे शिंदे यांच्या मागे उभे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या 3 पैकी 2 आमदार हे नॉट रिचेबल होते ते आता शिंदे सोबत बंडखोरी करुन सोबत असल्याचे या फोटोतून समोर आले आहे तर आमदार कैलास पाटील हे या गटाच्या तावडीतून सुटत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या फोटोत 32 आमदारांचा समावेश असून त्यात राज्यमंत्री बच्चू कडू हे शिंदे याच्या शेजारी बसले आहेत.
दरम्यान सुरत येथील हॉटेलमध्ये आमदार नितीन देशमुख यांच्यासह तानाजीराव सावंत यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हा प्रकार नेमका कशामुळे झाला व कोणी केला याची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकली नाही मात्र सेनेच्या काही आमदारांना तिथे हॉटेलमध्ये गुंडाकडून जबरदस्ती, मारहाण केल्याचा आरोप आमदारच्या निकटवर्तीयकडून होत असून त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा पुष्टी दिली आहे. नेमके हे आमदार स्वतः गेले की बळजबरीने नेले की तिथे गेल्यावर बिनसल्याने वादातून हे घडले हे नंतर स्पष्ट होणार आहे.
घरी बसेन पण शिवसेना सोडणार नाही – सावंत उवाच
घरी बसेन पण शिवसेना सोडणार नाही म्हणारे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी अवघ्या 15 दिवसातच भूमिका बदल्ल्याचे समोर आले आहे.
कोण भाजप ? मी भाजपात जाणार नाही.शिवसेनेला माझे जीवन व कर्म अर्पित असणार आहे. मी शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. एकवेळ मी घरी बसेन पण कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही असे वक्तव्य शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी उस्मानाबाद येथील शिवसंपर्क अभियानमध्ये 4 जून रोजी व्यक्त केले मात्र आता शिंदेनी बंड केल्यानंतर सावंत नॉट रिचेबल होत त्यांच्या कळपात सहभागी झाले.
मध्यंतरी डॉ तानाजीराव सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज व भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती मात्र त्याला सावंत यांनी पूर्णविराम देत भूमिका स्पष्ट केली आणि अवघ्या 15 दिवसातच सावंत नॉट रिचेबल झाले आहेत.शिवसेना माझ्या घरात मनात आहे,धाराशिव जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविणार हे वचन देतो असे ते म्हणाले होते पण त्यांनीच शिवसेनेची साथ सोडल्याचे दिसते.
जुन्या शिवसैनिकांच काय ? पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक व तरुण यांची मीटिंग बोलवावी, जे शिवसैनिक बाळासाहेब यांचे आहेत ज्यांनी रक्त सांडले आहे त्यांना मान व न्याय मिळायला हवा असे सावंत यांनी सांगितले. सावंत यांच्या या वक्तव्याने शिवसेनेत जुन्या नव्या वादाला पुष्टी देत हवा दिली होती.
======
*शिंदेच्या तावडीतून असे निसटले शिवसेना आमदार कैलास पाटील …. रातोरात गाठले मातोश्री, एकनिष्ठ आमदार*
https://www.samaysarathi.com/2022/06/MLA-kailas-.html?m=1