मारहाणीची अफ़वा, तसा प्रकार घडलाच नाही – धडा शिकवू ,आमदार तानाजी सावंत सुरत प्रकरणी स्पष्टीकरण
उस्मानाबाद – समय सारथी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ तानाजीराव सावंत हे स्वखुशीने गेले असून सावंत यांच्यावर शिंदे यांनी सुरत मोहिमेची महत्वाची जबाबदारी टाकली आहे त्यानुसार सावंत ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत.
सुरत येथे हॉटेलमध्ये सावंत यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याची माहिती काही राजकीय हीतशत्रूनी प्रसार माध्यमातून जाणीवपूर्वक आमच्या नेतृत्वाची बदनामी आणि प्रतिमा मलीन करण्यासाठी पेरली व पसरविली आहे. अफ़वा पेरणाऱ्या त्या लोकांना योग्य वेळी धडा शिकवू असा इशारा शिवसेनेचे सुरज साळुंके यांनी दैनिक समय सारथीशी बोलताना दिला आहे.
सावंत यांच्याशी याबाबत बोलण झाल्याचं साळुंके यांनी सांगत तसा प्रकार घडला नाही मात्र काही हितचिंतक चुकीची माहिती पसरवत आहेत, जे चुकीचं आहे.











