दिशाभूल – डबल ढोलकी आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख ठाकरेंनी सावध राहावे
मुंबईला जाण्याची व्यवस्था आम्ही केली – आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा खळबळजनक आरोप
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसनेचे आमदार कैलास पाटील हे स्वतः मोठ्या शिताफिने सुरत रस्त्याहुन सुटल्याचे खोटे सांगात असून ते पक्षप्रमुख यांच्यासह प्रसार माध्यमाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी केला आहे. कैलास पाटील हे डबल ढोलकी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापासून सावध राहावे, कैलास पाटील यांची मुंबईकडे येण्याची व्यवस्था आम्हीच केली होती. कैलास पाटील हे प्रसार माध्यमातून खोटे बोलत आहेत, अश्या बोलण्याने स्वतःचे महत्व वाढत नाही असे सांगत सावंत यांनी सर्व आमदार स्वखुशीने व कोणाचाही दबाव नसताना आले असल्याचे स्पष्ट केले. सावंत यांनी गुवाहटी वरून एक विडिओ प्रसिद्ध केला असून त्यात कैलास पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.