धाराशिव – समय सारथी
न्यायालयात खुन खटल्याची सुनावणी सुरु असताना साक्षीदार यांच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना धाराशिव येथील कोर्टाने ताब्यात घेतले व कोर्ट कामकाज संपेपर्यंत थांबवुन ठेवुन कडक शब्दात समज देऊन सुटका केली. न्यायाधीश मोहीते यांच्या कोर्टात खुनाच्या खटल्याची सुनावणी होती त्यावेळी देवानंद रोचकरी हे कोर्ट रूम बाहेरून साक्षीदार यांना हातवारे करीत दबाव टाकत होते. ही बाब कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने त्यांना आत बोलावले, प्रश्नांची सरबत्ती करीत कडक शब्दात सुनावत ताब्यात घेण्यास सांगितले. कोर्ट कामकाज संपेपर्यंत त्यांना तिथे थांबवून ठेवत नंतर ताकीत देऊन सोडण्यात आले, या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख तर आरोपीच्या बाजूने ऍड विशाल साखरे बाजु मांडत आहेत.