होऊ द्या फैसला.. हेच का तूमचे हिंदुत्व… की बेगडी प्रेम
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मांकावती तीर्थकुंड प्रकरणात काय झाले. लढा आता सुप्रीम कोर्टात
फौजदारी प्रक्रियेला स्थगिती देताना एकनाथ शिंदे तुमचे हात का थरथरले नाहीत … द्या उत्तर
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्टची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पवित्र प्राचीन मांकावती तीर्थकुंड प्रकरणी शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांचे बेगडी हिंदुत्व प्रेम यापूर्वीच समोर आले आहे. तुळजाभवानी येथील प्राचीन पुरातन मांकावती तीर्थकुंड प्रकरणात काय झाले ? फौजदारी प्रक्रियेला स्थगिती देताना मंत्री एकनाथ शिंदे तुमचे हात का थरथरले नाहीत …याचा सर्व खुलासा उच्च न्यायालयात पुराव्यासह करणार आहे. जिल्हधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुन्हे नोंद फौजदारी आदेशाला स्थगिती देण्याचे नियमबाह्य काम शिंदे यांनी कसे केले याची पोलखोल उच्च न्यायालयात पुराव्यासह होणार आहे.