औकातीत रहा – राजकीय प्रश्न सुटला की जसाच तसे उत्तर दिले जाईल
आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा आंदोलक शिवसैनिकांना इशारा
उस्मानाबाद – समय सारथी
आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत, एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जसाच तसें उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावे असे आवाहन व इशारा सावंत यांनी दिला आहे.
डॉ सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत आंदोलन केले तर पुणे येथील कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. त्यानंतर सावंत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वरील प्रतिक्रिया दिली.