शपथविधी – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह 6 मंत्री घेणार शपथ – धाराशिवमधून कोण?
धाराशिव ( उस्मानाबाद ) – समय सारथी
फडणवीस शिंदे सरकारचा आज शपथविधी सोहळा राजभवन येथे सायंकाळी 7 च्या सुमारास होणार असल्याची माहिती आहे यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत त्याच बरोबर भाजपचे 3 तर शिंदे गटातील 3 असे 6 जण पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे गृह मंत्री व नगरविकास खाते ठेवून घेणार असल्याचेही कळते. धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्ह्यातून आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचे पारडे जड आहे. एक जिल्हा एक मंत्रिपद यात सावंत यांना कौल दिला गेल्याचे समजते.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातुन शिंदे गटातून आमदार डॉ तानाजीराव सावंत व भाजपकडून आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे उद्या कोण शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे. सावंत हे भाजप सेना युतीच्या काळात जलसंधारण कॅबिनेट मंत्री होते तर आमदार पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादीत असताना राज्यमंत्री होते त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे शिवाय टे भाजपचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्ष संघटन व वाढीसाठी त्यांनी गेल्या काही वर्षात मोठे काम केले आहे. आमदार चौगुले हे 3 वेळेस निवडून आले तरी त्यांना वाटघाटीत एखादे महामंडळ दिले जाऊ शकते.