धाराशिव – समय सारथी
धाराशिव, बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलनकरीता केलेल्या कार्याबद्दल धाराशिव, बीड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन त्याचे वितरण 21 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
बाल विवाह रोखण्यात व त्या विषयी जनजागृती करण्यात दीपा ताई मुंडे यांचा मोठा वाटा असुन त्यांनी अनेक बालविवाह रोखले असुन मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यानंतर अनेक मुलींचे आयुष्य घडले त्या कार्याची दाखल घेत मुधोळ मुंडे यांचा पुरस्कार देत सन्मान केला आहे. मुधोळ यांनी सामान्य कुटुंब, वाडी, वस्ती, तांडे यावर स्वतः जात बाल विवाह रोखले शिवाय बालविवाह रोखन्यासाठी जनजागृती उपक्रम राबविले त्याचे फलित म्हणुन अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले व त्याच्या आयुष्यात हसू आले. अनेक मुलींच्या आयुष्यात त्यांनी बदल घडविला त्याची दाखल यानिमित्ताने घेतली गेली आहे.