धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी जयंत श्रीपतराव गायकवाड व तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक बाळासाहेब प्रकाश पवार यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली असुन 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार स्वीकारले.
तक्रारदार यांचे मालकीचे शेतीतील 20 गुंठे जमीनीचे खोदकाम करुन त्यातील मुरुम व माती आजुबाजुला पसरवून सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेवुन कोणतीही कारवाई न करण्यासाठी पंचासमक्ष 15 हजार रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 10 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पवार याने गायकवाड यांचे सांगण्यावरून पंचासमक्ष स्विकारले असता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी म्हणुन सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, धाराशिव युनिट,मार्गदर्शक अधिकारी संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा समावेश आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.