डिजिटल स्मार्ट टीव्ही जिल्हा परिषद शाळांना भेट, शिक्षणासाठी होणार उपयोग
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. मंत्री सावंत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, तालुका प्रमुख राहुल डोके यासह शाळेतील शिक्षक, पालक उपस्थितीत होते. देशाचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी असल्याने विद्यार्थी यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन स्वागत करीत आतापासुनच आनंद उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या देशाचे भवितव्य घडवणाऱ्या पिढीचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायला मला कायमच आवडते असे पालकमंत्री सावंत यांनी सांगितले. परंडा तालुका दौऱ्यादरम्यान भेटी करत असताना जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत मनमोकळेपणाने संवाद साधला.यावेळी अभ्यासाबरोबर, शारीरिक व्यायाम, खेळ, मोबाईल व टीव्हीचा मर्यादित व आवश्यक तेवढाच वापर, वृक्षरोपण, रुग्णसेवा, स्वच्छतेच महत्व, संस्कारातून व्यक्तिमत्वाची जडणघडण इ. बाबत सुद्धा हसत खेळत संवाद केला.
मंत्री सावंत यांच्यातील प्राध्यापक अनुभवला
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्हा परिषद शाळेसह अनेक शाळेत मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी डिजिटल स्मार्ट टीव्ही स्वखर्चातुन भेट दिली आहे. मंत्री सावंत हे स्वतः प्राध्यापक असल्याने ते शालेय मुलात चांगलेच रममान झाले व मनमोकळ्या गप्पा मारल्या, मुलांनी मांडलेले विषय व त्यांच्या अपेक्षा याचे निराकारण त्यांनी यावेळी केले. सावंत यांच्यातील शिक्षक व प्राध्यापक उपस्थितांना अनुभवता आला. जग बदलत असल्याने डिजिटल साधने अभ्यासात हवी आहेत ही गरज ओळखून सावंत यांनी आगामी काळात शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प यावेळी बोलुन दाखवला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा देण्यावर भर देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.