धाराशिव – समय सारथी
वयोवृद्ध जोडप्यांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा व धाराशिव शहर पोलिसांनी पकडली आहे.पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली असुन त्यांच्याकडून 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत या गुन्ह्याचा उलघडा करीत टोळी जेरबंद केली आहे.
अंबेहोळ येथील 65 वर्षीय चाँद शाहाबुद्दीन शेख 23 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास पत्नीसह धाराशिव येथुन आंबेहोळ गावाकडे जात असताना हॉटेल बालाघाट धाराशिवच्या पुढे मोटरसायकलवर तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून त्यांना मोटरसायकल वरुन उतरुन खाली पाडून वयोवृध्द महिला हिस चाकुने हातावर वार करुन, वयोवृध्द इसमास लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्यांना चाकुचा धाक दाखवूनन सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15 हजार जबरदस्तीने हिसकावून चोरी करुन घेवून गेले होते. पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनु 314/2024 कलम 309(6),115(2), 3(5) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
सदरचा गुन्हा हा अत्यंत क्लिनिष्ठ व गंभीर स्वरुपाचा असल्याने व कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाख, धाराशिव व पोलीस ठाणे धाराशिव शहर यांनी संयुक्तरित्या सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत चिकाटीने, कौशल्यपुर्ण तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी दिनेश नागनाथ काळे, वय 20 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव, ह.मु. कुरणे नगर धाराशिव व काका शंकर शिंदे, वय 21 वर्षे, रा. पिंपळगाव (क) ता. वाशी जि. धाराशिव यांना कुरणे नगर येथुन ताब्यात घेवून त्यांच्या कडे सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गुन्हा आम्ही व आमचा एक साथीदार यांनी केला आहे अशी कबुल केले.
गुन्हा करताना वापरलेले होंडा सीबी शाईन मोटरसायकल 70 हजार किंमतीची लुटमार केलेले नगदी 15 हजार सोन्याचे दागिने 09 ग्रॅम वजनाचे 27 हजार असा एकुण 1 लाख 12 हजार किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी धाराशिव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस ठाणे धाराशिव शहरचे पोलीस निरीक्षक शकील शेख, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव येथील सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, प्रदीप वाघमारे, मनोह शैला टेळे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,रवींद्र आरसेवाड, पोलीस अमंलदार सुनिल मोरे (TAW, चालक पोलीस अंमलदार प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड, पोलीस ठाणे धाराशिव शहर येथील पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार अमोल मंगरुळे यांच्या पथकाने केली आहे