धाराशिव – समय सारथी
राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी धाराशिव पोलिसात 11 आंदोलक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.धैर्यशील गोपाळराव सस्ते, रा. येडशी, निखील जगताप, रा. माउली चौक धाराशिव, निलेश सांळुके, बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, अक्षय अंकुश नाईकवाडी, रा. कौडगाव, अमित वसंतराव जाधव, रा. नारी ता. बार्शी, हणमंत यादव, बापू देशमुख रा. गणेश नगर धाराशिव, सौरभ गायकवाड, रा. तांबरी विभाग तेजस बोबडे, रा. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.15 ते 9.30 दरम्यान हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने यांनी आंदोलन केले. कोणतीही पुर्व सुचना न देता गैरकायद्याची मंडळी जमवून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्याची गरज नाही हे वक्तव्य केल्याचे निषेधार्थ व महाराष्ट्र शासना विरुध्द घोषणा देवून राज ठाकरे यांना हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथुन बाहेर पडण्यास मज्जाव केला.
जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन हनुमंत जालीदंर म्हैत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189 (2),323, 126(2) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.