धाराशिव – समय सारथी
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत भुमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी धाराशिव येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले, राज ठाकरे व मराठा आंदोलक यांची आमनेसामने चर्चा झाली. आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांनी भुमिका स्पष्ट करताना राज ठाकरे यांच्यावर त्यांना काय कळतंय अश्या शब्दात टीका केली.
राज ठाकरे यांना काय जाब विचारायचा, यांना आरक्षण म्हणजे काय कळणार आहे ? हे गोरगरीब जनतेशी खेळणारे लोक आहे, आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही.या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार.हे श्रीमंतीत जगणारे, पैशांवर झोपणारे लोक आहेत. आमची एखादी बहीण रडायली की ते त्याला भंपकपणा म्हणतात, नाटक म्हणतात. आम्हाला वेदना टोचतात, आमचा आक्रोश आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते आमच्या भावनांसोबत खेळतात.त्यांच्यापुढे काय आंदोलन करायचं? त्यांना काय भेटायचं ? आपला मराठा समाज खूप मोठा आहे, असं कोणालाही विचारायला जायचं का ? कोणालाही किंमत द्यायची नाही, आपला समाज मोठा आहे, त्यांना काय जाब विचारायचा, त्यांचे काय पाया पडायचे? काय गिनायच यांना, यांच्या तोंडपुढे पण उभ राहायचं नाही. सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवावा यांना काही किंमत द्यायची नाही. माझ्या मराठ्यांच्या पोरांना त्रास होता कामा नये असा इशाराही त्यांनी दिला.