आंदोलनाचा इशारा – तुळजापूर पार्किंग ठेकेदार राम छत्रे यांची कागदपत्रांची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील पार्किंग ठेका प्रकरणातील सर्व कागदपत्रे द्यावीत अशी मागणी ठेकेदार राम छत्रे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून माहिती न दिल्यास 21 ऑकटोबरपासून तुळजापूर नगर परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तुळजापूर शहर प्रवेश व पार्किंगच्या 1 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात छत्रे विरोधात गुन्हा नोंद झाला असून त्यातील कागदपत्रे त्यांनी मागितली आहेत तसेच घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.
1 फेब्रुवारी 2015 ते 31 जानेवारी 2018 या काळात छत्रे यांना वाहन पार्किंगचा ठेका तुळजापूर नगर परिषदेने दिला होता त्यातील माहिती मागवली आहे त्यात सदर लिलावाकामी नगरपरिषदेत भरणा केलेल्या पावत्याच्या सांक्षकिंत प्रति, करार नाम्यातील अटींचा भंग केल्याकामी निविदा कालावधीमध्ये देण्यात आलेल्या नोटीस यांच्या सांक्षाकित प्रति, सदर प्रकरणी झालेल्या चौकशी नुसार नगरपरिषदेमार्फत गुन्हा दाखल करणे कामी प्राधिकृत केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सांक्षाकित प्रति, निविदा कालावधीत निविदा धारकाने छापून घेतलेल्या पावत्या प्रमाणित करणे कामी यांनी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव व त्यांचे कार्यालयीन आदेशांच्या साक्षांकित प्रति,सदर लिलावाबाबत झालेल्या तक्रारी कामी नेमलेल्या समितीचे अहवालाच्या साक्षांकित प्रति, समितीच्या अहवालानुसार माझ्यावर गुन्हा दाखल करणे कामी आजपर्यंतय कार्यालयाकडून दिलेल्या आदेशाच्या व पत्रव्यवहाराच्या साक्षांकित प्रति, गुन्हे नोंदविलेल्या कोटी रूपयांचे अपहार केले बाबत सदरची तक्रार दाखल केली असून, याबाबत नगरपरिषदेने सदरच्या रक्कमेची परिगणना कशा प्रकारे केली आहे. त्याचा दस्ताऐवज तसेच नगरपरिषद स्तरावरील असलेल्या लेख्यामधील आकडेवाडीनुसार सदरचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.वाहनतळाच्या लिलावाकामी ठरविण्यात आलेली पायाभूत किंमत कशा प्रकारे ठरविण्यात आली आहे व ती ठरलेली किंमत इतर कोणत्याही शासकीय संस्थेकडून प्रमाणित करून घेण्यात आली आहे का? यांच्या साक्षांकित प्रति मागितल्या आहेत.
वाहनतळाच्या लिलावाकामी ठरविण्यात आलेल्या अटी व शर्ती हया कशाच्या आधारे ठरविण्यात आल्या ? या कामी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आदेशाची साक्षांकित प्रति, वाहनतळ लिलावाकामी दाखल करण्यात आलेला गुन्हयांमध्ये 1 कोटी रूपये अपहार म्हणुन नमुद करण्यात आलेले आहे. रक्कम कोणत्या आधारावरून,निष्कर्षावरून
दाखल केलेली आहे. तसेच या कामी नगरपरिषदेने कोणती समिती नेमली आहे का? असल्यास समिती
जिल्हाधिकारी कार्य केलेल्या आदेशाचा प्रति मागितल्या आहेत.