अभिमानास्पद – ऍड अमित मुंडे यांची नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष सरकारी वकील पदी नियुक्ती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादचे सुपुत्र ऍड अमित किशोरराव मुंडे यांची केंद्रीय गृह विभागाच्या अंतर्गत असलेल्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष सरकारी वकील पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्याकडे सिनेक्षेत्रासह अनेक महत्वाची प्रकरणे येणार आहेत.नार्कोटीक्स विभागाचे झोनल डायरेक्टर अमित गव्हाटे यांनी याबाबतचे आदेश काढले.
मुंडे हे सध्या केंद्र सरकारच्या 5 विभागात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. सीबीआय, आयकर विभाग, कस्टम विभाग, जीएसटीसह ते आता नार्कोटीक्स विभागात काम पाहणार आहेत.
मुंडे यांचा कायद्याचा सखोल अभ्यास व त्यांचे व्यक्तिमत्त्व याची दखल घेऊन त्यांच्यावरती या मोठ्या जबाबदारी सोपवलेली आहे.भारतातील सर्वोच्च एजन्सीने त्यांना त्यांचे विशेष वकील म्हणून नेमलेले आहे ही आपल्या जिल्ह्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे.