धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा व तालुक्याचे नाव असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ हेच नाव लोकसभेप्रमाणे कायम असणार आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ हे नाव निवडणुकीत वापरले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात नामांतर सुनावणी 2 ऑगस्ट पासुन सुरु होणार आहे त्यामुळे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. उच्च न्यायालयाने धाराशिव हे नाव कायम ठेवले आहे, शिंदे भाजप सरकारने व त्यापूर्वी ठाकरे,काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडी अश्या दोघांनी धाराशिव नावाचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अपक्ष व निवडणुक निर्णय अधिकारी अश्या 31 जणांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ती प्रलंबित असल्याने कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट हे सिलबंद असणार आहेत.
विधानसभा निवडणूकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील 2 हजार ईव्हीएम, 1 हजार 300 कंट्रोल युनिट व 600 व्हीव्हीपॅट मशीन येणार आहेत तर हिंगोली येथून 1 हजार 690 ईव्हीएम, 40 कंट्रोल युनिट व 700 व्हीव्हीपॅट मशीन येणार आहेत.