शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीन वर्ग-1 मध्ये कायम ठेवणे बाबत
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले. येत्या 2 आठवड्यातधाराशिवकरांना आनंदाची बातमी मिळणार आहे याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शब्द दिला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली आहे.
महसूल मंत्र्यांनी जी अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती त्यात अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती त्यामध्ये आपण एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते पण अद्याप पर्यंत सदरील विषयाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ही बाब निदर्शनास आणुन दिली.सदरील सर्व जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये कायम ठेवणेबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी निवेदन देऊन विनंती केली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील विषयांमध्ये एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे साळुंके यांनी सांगितले.