धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील कृषी विभागाने कारवाई करीत 400 पोते बोगस एनपीके खत जप्त केले असुन 2 आरोपी विरोधात तामलवाडी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. 5 लाख 88 हजार रुपये किमतीचे हे खत विक्रीसाठी साठा करुन ठेवले होते मात्र ते कृषी विभागाने छापा टाकून पकडले.
साहेबराव दिवेकर यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस NPK 10:26:26 ( 400 पोते ज्याची किंमत 5 लाख 88 हजार ) निदर्शनास आल्यामुळे पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्याची फिर्याद प्रवीण पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धाराशिव यांनी दिली. सोबत मोहीम अधिकारी डी ए गरगडे, तालुका कृषि अधिकारी अवधूत मुळे, पंचायत समिती तुळजापूर कार्यालयाचे कृषी अधिकारी सतीश पिंपरकर होते. याकामी प्रवीण विठ्ठल, भोर तंत्र अधिकारी गु नि लातूर यांनी सखोल मार्गदर्शन व नियोजन केले.