जागर स्त्रीशक्तीचा, आई तुळजाभवानीचा – लेडीज क्लबच्या 3 दिवशीय दांडिया महोत्सवाची सांगता
आदर करा, करीअर करण्यासाठी संधी देत पाठबळ हाच सन्मान – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
उस्मानाबाद – समय सारथी
स्त्रीशक्ती व मातृशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा जागर करीत लेडीज क्लबच्या 3 दिवशीय दांडिया महोत्सवाची सांगता करण्यात आली या तिन्ही दिवसात गर्दीने एक नवा विक्रम करीत दांडियाचा आनंद लुटला. शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हजेरी लावत प्रेक्षकांची मने जिंकली.
जेव्हा आपण आपल्या घरातल्या व समाजातल्या प्रत्येक महिलेचा आणि स्त्रीचा आदर करतो तेव्हा आपण रोज नवरात्र उत्सव साजरा करण्यासारखा आहे त्यामुळे आदर करत राहा, तिला करिअर करण्याची संधी द्या व पाठिंबा द्या मगच खऱ्या अर्थाने देवीचा सन्मान करू असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.पुन्हा इथे उस्मानाबादला बोलाविल्याबद्दल सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व अध्यक्षा अर्चना पाटील यांचे आभार मानले. चित्रपट सृष्टीच्यामध्ये लोकांनी खूप प्रेम दिले म्हणून टिकून राहण्याची हिम्मत व जिद्द मिळाली. टाळ्यांची भरभरून साद दिली, महिलासोबत पुरुषांची सुद्धा मोठी गर्दी असून महिलांची सुरक्षितात बाळगली त्याबद्दल कुलकर्णी हिने आभार मानले.
स्त्री पुरुष, नवरा बायको हे गाडीचे दोन चाके आहेत आणि दोघांनी एकत्र आल्यावर घर, समाज, देश चालवू तरच मग आपण प्रगती करू. अर्चना पाटील यांच्या आग्रहास्तव छत्रपती ताराराणी या फिल्मचे शूटिंग सोडून आल्याचे तिने सांगितले. बकुळा, गाढवाच लग्न, नटरंग, हिरकणी यातील व्यक्ती रेखावर प्रेम केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. तुळजाभवानी जगभर कशी पोहचेल यासाठी आमदार पाटील व अर्चना ताई प्रयत्न करीत असलेबद्दल कौतुक केले.
अप्सरा आली, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, तुझ्या रूपाच चांदण पडलं गाणं वाजू द्या, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? या गाण्यावर तर लहान मुलींनी सोनाली कुलकर्णी सोबत डान्स केला आणि हे दृश्य कॅमेरात टिपण्याचा मोह आमदार राणा पाटील यांना आवरता आला नाही त्यांनी स्वतः कॅमेरा घेऊन हा आनंदी क्षण टिपला. हा 3 दिवशीय दांडिया महोत्सव यशस्वी करण्यात लेडीज क्लबच्या महिला, उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचे मोठे सहकार्य लाभले.