धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाकडुन जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित वेळेत कार्यवाही होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली होती त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी यात लक्ष घातले आहे.
जात पडताळणी समिती सदस्य बी जी पवार यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढुन तो इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची कार्यवाही करावी असे पत्र जिल्हाधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना पाठवले आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक प्रस्ताव प्रलंबित असुन विद्यार्थी यांचे शालेय नुकसान होत आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांना निवेदन दिले होते त्यावर जिल्हाधिकारी यांनी शिफारस केली आहे, मराठा आंदोलकांच्या मागणीला यश मिळाले आहे.