मराठा आरक्षणसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत – पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा समावेश
उस्मानाबाद – समय सारथी
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्तिथीबाबत तसेच संलग्न बाबीवरील शिफारसीवर करायच्या कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीगठीत करण्यात आली आहे.या समितीत उस्मानाबादचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्याचे उच्च शिक्षण संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर सदस्यपदी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खणीकर्म मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत. आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असणार आहेत तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव या उपसमितीचे सचिव असणार आहेत.
मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षणा संदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये शासनाच्या वरीने बाजू मांडण्यासाठी विशेष समुपदेशीच्या नियुक्तीची शिफारस करणे, त्याचे मानधन ठराविणे, सूचना देणे, न्यायालयाने परीत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे, मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात उचित निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार असतील तसेच गरजेनुसार विचार विनिमय करण्यासाठी तज्ञ, विधिज्ञ व संबंधित अधिकारी यांना आमंत्रित करण्याचे अधिकार राहतील.