धाराशिव – समय सारथी
परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे व पोलीस हवालदार महादेव तात्याभाऊ मुंडे या दोघांना 5 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांचे मालकीचे उपळाई पाटी, सोलापुर धुळे महामार्ग, तालुका कळंब येथे दिनेश व्हेज/नॅानव्हेज या नावाचे रेस्टॅारंट असुन सदर धाब्या समोर काही दिवसापुर्वी 3 शेळया व 2 बकरे बेवारस मिळुन आले होते. सदर शेळया व बकरे तक्रारदार यांचे ताब्यात मिळालेबाबत तक्रारदार यांचेवर चोरीचा गुन्हा नोंद न करता तक्रारदार यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 अन्वये किरकोळ कारवाई केली व तक्रारदार यांना मदत केली म्हणुन पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवालदार महादेव मुंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष बक्षीस म्हणुन 5 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.
मुंडे यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपये लाच रक्कम स्विकारली असता आलोसे पोउनि बहुरे व मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव याच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, नागेश शेरकर यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.